Posts

जिल्हा परिषद शाळांचा पट कमी होत चाललाय..

  सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थी संख्येला उतरती कळा लागलेली आहे. दिवसेंदिवस शाळांमधील विद्यार्थी संख्या ही कमी कमी होत चाललेली आहे. बऱ्याचश्या शाळा ह्या वीस पटा पेक्षाही कमी विद्यार्थी संख्या असलेल्या आहेत. अशा शाळा बंद करणे हे शासनाच्या विचाराधीन आहे. किंबहुना लवकरच अशा शाळा बंद पडतील आणि येणाऱ्या पुढच्या पाच-दहा वर्षांमध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थी संख्येविना ओस पडतील की काय अशी भीती जनमानसात आहे. पूर्वी आजच्यासारखी मोफत पाठ्यपुस्तके मिळत नसायची. वरच्या वर्गातील एखाद्या हुशार मुला- मुलींची जुनी पुस्तकं पाऊण किमतीमध्ये खरेदी करणे हा त्या वेळचा मुलांचा आणि पालकांचा सगळ्यात मोठा ओढा होता. पोषण आहार मिळत नसायचा. पूरक आहार देखील मिळत नसायचा. शाळेत येणाऱ्या मुलां- मुलींसाठी मोफत गणवेश देखील मिळत नसायचे. शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक वर्ग पुरेसा नसायचा. तरीदेखील गावातील शाळांमधील वर्ग हे विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेले असायचे. बडबड गीते, गाणी, उजळणी, पाढे , अध्यापन या सर्वांमुळे शाळा कशा गजबजलेल्या असायच्या. शाळा ही घरापासून, शेतापासून खूप दूर असा...